पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व अन्य वस्तूच्या दरवाढीच्या निषेधार्थ लोणार बस स्थानक समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निषेध आंदोलन
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. त्यांनी एकही आश्वासन तर पाळले नाहीच, शिवाय जनतेच्या मानगुटीवर विपरीत महागाई बसवली असा आरोप करत डिझेल, पेट्रोल, गॅस या इंधनासह खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ वाढलेल्या किमती मागे केंद्र सरकारची धोरणे आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोणार बसस्थानकासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
जेव्हा भाजपने निवडणुकीला सामोरे जाताना देशातील जनतेला आश्वासन दिले होते की, त्यावेळी 60 रुपये प्रति लिटर पेट्रोल, 57 रुपये डिझेल, 414 रुपये गॅस सिलेंडर, 52 रुपये किलो खाद्य तेल होते. तेव्हा आम्ही हे दर कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र आता तेच पेट्रोल 107 रुपये, डिझेल 97 रुपये प्रति लिटर, गॅस ची किंमत 910 रुपयांवर गेली. खाद्यतेल 180 रुपये किलोवर पोहोचले आणि एकूणच महागाईचा आलेख जनतेच्या परवडण्यापलीकडे गेला. असा आरोप आज राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला.
लोणार येथील बसस्थानकासमोर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात किशोर मापारी, डॉ विक्रांत मापारी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सदानंद तेजनंकर, पुरुषोत्तम पाटील पडघाम, सैय्यद युसुफ अली, प्रा लुकमान कुरेशी, राजु इंगळे, जि. प. सदस्य सैय्यद उमर, इब्राहिम शेख, समाधान पाटील, मोहम्मद गुफरान कुरेशी, संतोष बंडु पडघाम, शुभम खंड, पुरुषोत्तम जाधव, नागरे, आकाश डोळे, हर्षद पाटील, शिवाजी डोळे, सैय्यद मुजीब, समाधान पोफळे आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.