शिरूर : महान्यूज लाईव्ह
वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील सचिन शेलार यांची ग्रामसंवाद सरपंच संघाच्या शिरूर तालुकाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजिनाथ धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष सतीश पवार व प्रियांका शेळके यांच्या सूचनेनुसार त्याची ऑनलाईन निवड करण्यात आली. त्याबाबत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
ग्रामसंवाद सरपंच संघ हे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करत असून संघटनेच्या मार्फत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना अधिकार व कर्तव्याची जाणीव करुन देऊन शासनाच्या विविध योजना या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश या संघटनेचा आहे.
या पुढील काळात सर्वसामान्यांसाठी भरीव काम करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना शेलार यांनी सांगितले. या निवडीबददल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुधीर फराटे, संघटक वीरेंद्र शेलार आदींनी शेलार यांचे अभिनंदन केले आहे.