बारामती: महान्यूज लाईव्ह
माळेगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात मालेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पोलिसांनी काल रात्री अटक केली अजूनही काही पदाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे
रविराज तावरे यांच्यावर 31 मे रोजी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला होता . यामध्ये तावरे हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी याआधीच मोरे टोळीला अटक केली असून, मोक्कांतर्गत कारवाई देखील केली आहे. यामध्ये प्रशांत मोरे, टॉम मोरे, राहुल उर्फ रीबल कृष्णांत यादव आणि गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा यामध्ये समावेश आहे. या चौघांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी रविराज तावरे यांचा या घटनेतील जबाब घेतला. या जबाबामध्ये रविराज तावरे यांनी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे, तसेच माळेगावमधील बड्या उद्योजकांचेही नाव या जबाबात सांगितल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी काल रात्री माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यास ताब्यात घेतले. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये