ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
आपल्या शेतात उगवणारा गुळवेल कधी पाहिलाय का? गुळवेल खा आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करा. आयुर्वेदीक औषधामध्ये उपलब्ध असणारा गुळवेल आपल्या शेतात कुठेही मिळु शकतो. गुळवेल खाल्याने अनेक आजार होत नाहीत. आपल्याला अँटी आॅक्सीडंट, लोह, तांबे, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, मँगेनिज यातून मिळत असते.
गुळवेलाचा काढा करुन पिल्याने अनेक आजारांवर मात होते. काढा कमीत कमी एक महिन्यात आठ वेळा घेतला पाहिजे. काढा तयार करण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजे, एक भांड्यात गुळवेलाचे तुकडे ठेचुन घ्या, त्यात दोन ग्लास पाणी घालून ते पाणी एक ग्लास होई पर्यंत उकळुन घ्या.
गुळवेल खाल्याचे फायदे
१) सतत बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप अशा आजारांवर गुळवेलाचा काढा घेतल्याने आराम मिळतो.
२) गुळवेलाचा काढा घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असुन पचनशक्ती नियंत्रित राहते.
३) किडनी आणि यकृतातील विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत होत असुन रक्तही शुध्द होण्यासाठी मदत होते.
४) चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम आणि काळेपण दूर होण्यास मदत होते. सांधेदुखी कमी होते . रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ स्थिर होण्यासाठी मदत होते. गुळवेलाच्या काढ्याचे सेवन करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.