राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे रविवारी रात्री दोन युवकांची दगडाने ठेचून हत्या केली..घटना भयानक होतीच, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कायद्याला न जुमानणाऱ्यांना सुतासारखे सरळ केलेल्या जिल्हा पोलिसांसाठी आव्हानात्मकही होती.. मात्र पुणे जिल्ह्याचे गुन्हे अन्वेषण पथक आणि प्रत्येक पोलिस ठाण्यांमधील तपासाचे जाळे एवढे मजबूत केले आहे की, आता पुणे जिल्ह्यात गुन्हेगार फार काळ लपून बसणे मुमकीनही नही नामुमकीन है… कारण समोर आहेत, जिल्ह्याचे पोलिसप्रमुख अभिनव देशमुख..! डॉक्टरांनी आता गुन्हेगारीची सर्जरी सुरू केली आहे..म्हणूनच पाटसचे गुन्हेगारही फार काळ लपून राहू शकले नाहीत.. बारा तासाच्या आत पोलिसांनी त्यांना जेरबंद करून टाकले..बारामतीच्या विमानतळ परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.!
पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून प्रत्यक्षात पाहणी केली. सकाळीच त्यांनी भेट दिली आणि गुन्हेगार सापडत नाहीत, तोवर येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि तसेच झाले..! जिथे जाईल, तेथील जिल्हयातील गुन्हेगारीची पाळेमुळे मोडीत काढणाऱ्या एसपी साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ करीत पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जलद गतीने पावले उचलली.
साहेब थांबून होते आणि चार आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यातही घेतले. दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील तामखंडा येथील श्री. भानोबा मंदीरासमोर रविवारी (दि.4) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) या दोन युवकांचा काढ्या,तलवारी आणि दगडाने ठेचून निघृन्न खून केल्याची धकादायक घटना घडली.
याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ) , योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे ) व आणखी एकास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. बारामतीच्या विमानतळ परिसरातून हे चार आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना यवत, बारामती पोलिसांनी सहकार्य केले.
या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच जिल्हा ग्रामिण पोलीसांची पथके तैनात केली होती. यावेळी खुद्द पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आदी या तपासावर थेट लक्ष ठेवून होते.