घटनास्थळी दिली भेट
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे काल रविवारी रात्री दोन युवकांचा काठ्या, तलवारी आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. आज पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून प्रत्यक्षात पाहणी केली.
जिल्हयातील गुन्हेगारीची पाळेमुळे मोडीत काढणार आहे. या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीसांचे पथक विविध ठिकाणी तैनात केले आहे. काही आरोपींची माहिती मिळाली असून लवकरच अटक करण्यात येईल. अशी माहिती पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी बोलताना दिली.
दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील तामखंडा येथील श्री. भानोबा मंदीरासमोर रविवारी (दि.4) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) या दोन युवकांचा काठ्या, तलवारी आणि दगडाने ठेचून निघृण खून केल्याची धकादायक घटना घडली.
याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ) , योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे ) व इतर चार ते पाच अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही. यांच्या गुन्हा यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पाटस मध्ये रात्रीपासून तणावाची परिस्थिती आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी पाटस परिसरात पोलीसांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे.
पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा. आभिनव देशमुख यांनी आज सोमवारी (दि.5) घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती जाणून घेतली. या घटनेतील मयत युवक आणि आरोपी हे 20 ते 30 वयोगटातील आहेत.
युवकांची गुन्हेगारी वाढत असल्याने देशमुख यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. जिल्हयात वाढत चाललेली अवैध व्यवसाय आणि त्यातूनच वाढत चाललेली गुन्हेगारी यावर लवकरच ठोस पावले उचलणार असून गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे मत डॅा. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
तसेच या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच जिल्हा ग्रामिण पोलीसांची पथके तैनात केली आहे. यावेळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.