सुरेश मिसाळ: महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात थोपवली असे म्हणत असतानाच बाजारपेठा खुल्या केल्या नंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत विशेषतः ग्रामीण भागात ही संख्या जास्त वाढत असल्याने ती चिंताजनक आहे आणि यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
इंदापूर तालुक्यात एक जुलै रोजी 36 रुग्ण आढळले होते. मात्र दोन जुलै रोजी ही संख्या तब्बल 61 वर; तर तीन जुलै रोजी ही संख्या 50 एवढी आढळली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आणि कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असे प्रमाण पाहायला मिळत होते.
मात्र गेल्या तीन दिवसात पुन्हा एकदा हे चित्र उलटे फिरु लागले असून, एक जुलै रोजी 36 रुग्ण आढळल्यानंतर 62 जणांना घरी सोडण्यात आले होते, तर दोन जुलै रोजी 61 रुग्ण आढळले, त्यादिवशी 21 रूग्णांनी कोरोना वर मात केली होती. तीन जुलै रोजी आढळलेल्या पन्नास रुग्णांच्या तुलनेत 34 रुग्णांना कोरोनावर मात केल्याबद्दल घरी सोडण्यात आले. काल दिवसभरात इंदापूर तालुक्यात व बाहेरील तालुक्यात मिळून सर्व प्रकारच्या तपासण्यांमध्ये 558 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 50 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. इंदापूर तालुक्यातील एकूण मृतांची संख्या 404 वर पोचली आहे.