महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एकेकाळी चायनीज पब्जी ने भारतामध्ये धुमाकूळ घातला होता. केंद्र सरकारने चायनीज अॅपना दणका दिल्यानंतर या ॲप मध्ये पब्जी देखील नाहीशी झाली. याच दरम्यान भारतीय पब्जी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. आज ‘बॅटल ग्राउंड मोबाईल डाटा’ म्हणजेच बीएमआय या व्हिडिओ गेम, मोबाईल गेमचे अधिकृत व्हर्जन बाजारात आले.
ही ग्रॅम लॉन्च होताच एका तासात एक कोटीहून अधिक जणांनी ती डाऊनलोड केली. ही गेम सध्या अँड्रॉइड स्मार्टफोन साठी उपलब्ध असून, प्लेस्टोर वरती उपलब्ध आहे. ज्या फोन मध्ये 2 जीबी रॅम डाटा आहे अशा मोबाईल मध्ये ही गेम उपलब्ध होईल.