पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील आकुर्डी येथील व्यवसायिक आनंद गुजर 43 यांचा मृतदेह आज सकाळी पुणे-सातारा मार्गावर कात्रज घाटात आढळल्याने मोठी खळबळ उडाली
आज सकाळी कात्रज घाटामध्ये एक दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी एक अनोळखी मृतदेह दिसून आला. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवताना तो आनंद गुजरांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, परिसरात मोठी खळबळ उडाली.
आनंद गुजर यांचे एक रिसॉर्ट असून ते आकुर्डी येथील व्यवसायिक आहेत. दरम्यान भारती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, निरीक्षक पासलकर व फौजदार शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आनंद गुजर यांचा घात आहे का अपघात आहे या दृष्टीने तपास सुरू केला. सध्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.