मुंबई – महान्यूज लाईव्ह
पाणीदार अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान यांचा १५ वर्षांचा विवाह मोडीत निघाला आहे. किरण राव व अमीर खान यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोघांनी संयुक्तरित्या निवेदन जारी केले आहे,
पत्नी किरण राव आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असून २००५ पासून सुरू असलेल्या या वैवाहिक आयुष्यातून दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय परस्परसहमतीने घेतला आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी या दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘आम्ही १५ वर्षे एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू. हा अध्याय पती- पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता. आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू.’