चितोडा गावात गैरकायदेशीर मंडळी जमविल्याचा आरोप; दलित पँथर सेने चे दीपक केदारे यांच्या विरुद्धही गुन्हा
दोन्ही गटाकडील १२५ कार्यकर्त्यांवरही गुन्हे! चितोडा गावात गेले होते दोन्ही गट
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
आपल्या वादग्रस्त शैलीने नेहमीच चर्चेत राहणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांना खामगावातील चितोडा गावात जाऊन गर्दी जमविणे महागात पडल्याचे दिसून येत आहे. चोहीकडून वाढलेल्या दबावानंतर आज अखेर पोलिसांनी आमदार गायकवाड़ आणि दलित पँथर दीपक केदारे यांच्यासह दोन्ही गटातील १२५ च्यावर कार्यकर्त्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विदर्भातील बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांनी दोन कुटुंबात आपसी वाद निर्माण झालेल्या खामगाव तालुक्यातील चितोडा या गावातील कुटुंबाला बुधवारी भेट दिली होती. या वादात आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेत आपल्या शेकडो समर्थकांसह गावात पोहचून त्यांनी बोलतांना वादग्रस्त व चिथावणीखोर विधान केले. यांनतर लगेच दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय संयोजक दीपक केदारे हेही आपल्या कार्यकर्त्यांसह गावात पोहचून निषेध नोंदवला.
या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात आमदार गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्याने अनेक ठिकाणी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या. परिस्थिती बिघडत चालल्याचे पाहून पाहून गुरुवारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी छोटोडा गावात पोहचून दोन्ही कुटुंबियांना समेट घडविण्याचा व शांतता राखण्याचं प्रयत्न केला.
यानंतर आज पोलिसांनी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांना खामगावातील चितोडा गावात जाऊन गर्दी जमविल्याबद्दल गायकवाड आणि दलित पँथरचे दीपक केदारे यांच्यासह दोन्ही गटातील १२५ च्यावर कार्यकर्त्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.