दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई पंचायत समितीमध्ये कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषीदिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाच्या निमित्ताने वाई तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या कर्तुत्वावर अतिशय चांगल्या पद्धतीची शेती करून वाई तालुक्याचे नाव राज्य पातळीवर शेती या व्यवसायात लौकिक केले अशा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले. गटविकास अधिकारी, उपसभापती व सभापती यांनी मार्गदर्शन करून कृषी दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला वाई पंचायत समितीच्या विद्यमान सभापती संगीता चव्हाण, उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी दळवी, ग्राहक पंचायतीच्या वाई अध्यक्ष सुभद्रा नागपूरकर यांच्यासह पंचायत समितीतील कृषी विभागाचा सर्व कर्मचारी व तालुका जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धैतील विजेते शेतकरी उपस्थित होते.