संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार येथील श्री भाईजी संस्थेचे कर्मचारी पार्शवनाथ जैन सेवानिवृत्ती झाल्याने संस्थेचे चिफ मॅने्जिंग डायरेकटर सुकेश झंवर आणि विभागीय व्यवस्थापक देशमाने यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
लोणार कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पार्शवनाथ जैन यांचा सत्कार केला. तसेच शाखेचे स्थानिक संचालक शिवाशेठ मुंधडा, किसनराव जाधव, शिवप्रसाद सारडा, श्रीनिवास मुंधडा, शमुक्ताजी सोनुने, गजानन रिंढे तसेच विवेकानंद अर्बन पतसंस्थेचे संचालक बोराळकर, ज्ञानेश्वर मापारी, लोणार येथील पत्रकार संदीप मापारी, राहुल सरदार, मोरे अण्णा, अनिल झांबड, पांडुरंग सरकटे, एँड आवचार उपस्थित होते.
मेहकर शाखेचे व्यवस्थापक पंडित नवघरे , सुलतानपूर शाखा व्यवस्थापक सुरेश चव्हाण, देऊळगाव माळी प्रभारी शाखा व्यवस्थापक संतोष खिल्लारी, तळणी शाखा व्यवस्थापक काटकर , गिरी तसेच शाखा लोणार येथील सर्व कर्मचारी हेही या सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते. पार्श्वनाथ जैन यांचा सत्कार केला. यावेळी सुपट्यानं, संतोष मापारी, शिवप्रसाद सारडा, राहुल सरदार, देशमाने , गोपाल सावळे आदींनी मनोगत व्यक्त करून जैन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.