विशाल कदम : महान्युज लाईव्ह
पुणे : भिशीत गुंतवणुक केल्यास जादा पैसे मिळतील असे आमिष दाखवून बाप लेकांनी एका “फूल” व्यापाऱ्याला तब्बल ६७ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मार्केडयार्ड (पुणे) येथे उघडकीस आला आहे.
हिरेन ट्रेडिंग कंपनीचे मालक भरत जोशी, आणि त्याची दोन मुले हिरेन जोशी आणि दीपक जोशी यांच्यावर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद माने (वय ५३, रा, धनकवडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद माने यांचा मार्केटयार्डात फुलाचे प्रसिध्द व्यापारी आहेत. हिरेन जोशी यांचा मार्केटयार्डात हिरेन ट्रेडिंग कंपनी बारदाना विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे आनंद माने आणि हिरेन जोशी हे दोघे एकमेकांचे परिचयाचे होते. ५ वर्षापूर्वी भरत जोशी आणि त्यांची दोन मुले हिरेन आणि दीपक यांनी माने यांना भिशीत पैशे गुंतवणूक करण्यास सांगितले. या भिशीमध्ये वेगवेगळ्या योजना असून, गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवूत त्यांचा विश्वास संपादन केला.
आनंद माने यांनी भिशीमध्ये थोडे पैसे गुंतवले. तेव्हा माने यांना सुरुवातीला जोशी यांनी चांगाला परतावा दिला. पण, माने यांनी त्यांच्याकडे अजून भिशी लावल्या होत्या. भिशी संपल्यानंतर माने यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, जोशी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच माने यांच्याबरोबर संपर्कही तोडला. जोशी यांनी भिशी योजना बंद करून माने यांची ६७ लाख ३२ हजार ३९० रुपयांची फसवणूक केली, म्हणून माने यांनी वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.