खासदार सुप्रिया सुळेंनी वाढदिसानिमित्त मुलीने दिलेल्या स्पेशल गिफ्टबद्दल भावना ट्विट करून केल्या व्यक्त
शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस 30 जून रोजी साजरा झाला असून, त्यांचा वाढदिवस कुटुंबाबरोबर त्यांच्या घरी साजरा केला आहे. वाढदिवसासाठी सुप्रिया सुळेंच्या मुलीने स्वतः च्या पैशांनी केक आणल्यामुळे वाढदिवसाचं या स्पेशल गिफ्टने त्या भावनिक झाल्या असून, त्यांनी या भावना ट्विट करून व्यक्त केल्या आहे.
‘हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं’.
“आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवस साजरा केला, हे क्षण अनमोल आहेत,” असं यावेळी सुप्रिया सुळेंनी लिहिलं आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल आपले मनापासून आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटात आपण आपली अनेक जीवाभावाची माणसं गमावली, त्या सर्वांची आज आठवण येत आहे. त्यांचे स्मरण करतानाच आपण केलेल्या अभिष्टचिंतनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते,’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.