तिघांवर गुन्हा दाखल, दौंड तालुक्यातील खानोटा येथील घटना..!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील खानोटा येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून नातेवाईकांनीच आई आणि मुलास लाथाबुक्याने जबर मारहाण केली. घरासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. या कारवाईत बापू उर्फ इंद्रजित अर्जून कांबळे, किशोर सुभाष शिंदे,शहाजी शिवाजी गायकवाड (सर्व रा.खानोटा ता.दौंड जि पुणे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की. लता प्रकाश जाधव ( वय-55 रा. खानोटा ता. दौंड ) या घराजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्याची साफसफाई करीत असताना या आरोपींनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली.
यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे या तिघांनी घरासमोर उभी असलेला महिंद्र कंपनीची पिक-अप गाडी (नं MH.42 .AQ .9641 ) तोडफोड केली. यावेळी लता यांचा मुलगा अरूण घराकडे येत असताना त्याची महिंद्र कंपनीची चार चाकी गाडी (नं MH 42 K 6713 ) अडवून गाडीचे नुकसान करीत शिवागाळ करीत हाताने लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत लता जाधव यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.