बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसात अगदी शेकड्यांमध्ये तपासण्या केल्यानंतरही 5, 6, 13, 12 अशा स्वरूपाचे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र अचानक मध्येच कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काल बारामतीमध्ये 52; इंदापूरमध्ये 36 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्याच्या जोडीला रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील जाणवण्याइतपत आढळत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
इंदापूर बारामती मध्ये कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी उसरली आहे. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने उसळलेल्या दिसत आहेत. भारतात कोरोना संपलेला नाही तो अधूनमधून त्याची दहशत दाखवत आहे. परवा केलेल्या तपासणीमध्ये बारामती तालुक्यात 29 जून रोजी 16 रुग्ण आढळले होते तर 30 जून रोजी हीच संख्या 52 वर पोचले असून यापैकी पन्नास जण बारामती तालुक्यातील तर दोन जण इतर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण आहेत बारामती तालुक्यातही शहरांमध्ये फक्त 8 रुग्ण असून ग्रामीण भागांमध्ये मात्र 42 रुग्ण आढळले आहेत. बारामती मध्ये मागील आठवड्यात चार दिवसात 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे धोकाही कमी झाला आहे, अशा आविर्भावात कोणीही राहू नये असाच धडा सध्या कोरोनाने दिला आहे.
इंदापूर तालुक्याची ही स्थिती तीच आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसातील रुग्णसंख्या पाहता, काल एक जून रोजी तब्बल 36 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. 30 जून रोजी ही संख्या 27; 29 जून रोजी 11; 28 जून रोजी 21 तर 27 जून रोजी फक्त 10 होती. तर गेल्या तीन दिवसांमध्ये इंदापूर तालुक्यात कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.