सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कुंभारगाव गावचा वाढीव गावठाण प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा केला गेला असून त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने ठराव करून तो प्रस्ताव वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.
कुंभारगाव पुनर्वसित होऊन गेली चाळीस वर्षे उलटलेली असताना सदर पुनर्वसित मिळालेले दीड गुंठ्याचे प्लॉटमध्ये तीन पिढ्यांची वंशावळ राहणे अशक्यच झाले आहे व अपुऱ्या जागांमुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत.
या सर्व गोष्टी लक्षात घेता ग्रामपंचायत कुंभारगाव चे सरपंच सौ.उज्वला दत्तात्रेय परदेशी, उपसरपंच सौ स्वाती उदय भोईटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एक मताने वाढीव गावठाणचा ग्रामपंचायत ठराव करून सदर प्रस्ताव व निवेदन इंदापुर चे नायब तहसीलदार श्री. लवांडे यांच्याकडे दिला आहे.
लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयांच्या परवानगीने नवीन गावठाण प्रश्न सोडवला जाईल, असे मत ग्रा.पं सदस्य व भाजपाचे अनुसूचित जाती विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील लोंढे यांनी व्यक्त केले.