माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – शेत जमिनीच्या वादावरून शेतातील पिकांचे नुकसान करून आई वडीलांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी भोर तालुक्यातील नाव्ही या गावातील एकावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद सोपान सोनवणे रा. नाव्ही १५ ( ता. भोर ) असे जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल विश्वास गायकवाड ( रा. भोंगवली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलम तसेच नागरी हक्क संरक्षण कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील करत आहे.
भोंगवली गावचे हद्दीत वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर ४६८ व ४६९ च्या वादावरून फिर्यादी आणि फिर्यादी यांचे आई-वडील तसेच चुलत भाऊ यांना आरोपीने फिर्यादी वहिवाटीत असलेले शेत जमिनीमध्ये अनाधिकराने प्रवेश करून शेतातील पिकाचे नुकसान करून दमदाटी केली. तसेच फिर्यादी यांच्या आई-वडिलांना हाताने मारहाण जातीवरून अपशब्द भाषा वापरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.