हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी देवराज कोंडीबा जाधव यांची तर व्हाईस चेअरमनपदी सत्यशील भिकाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुतन चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाच्या निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चेअरमनपदासाठी देवराज जाधव ( निमगाव केतकी) व उपाध्यक्षपदी सत्यशील पाटील ( वालचंदनगर ) यांचे एकमेव अर्ज दाखल झाले.
त्यामुळे या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांनी केली. या निवडीनंतर भाजपचे नेते, माजी मंत्री व बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देवराज जाधव व सत्यशील पाटील या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
इंदापूर अर्बन बँक गेली अडीच दशके चांगल्या पद्धतीने कामकाज करीत असून, हजारो संसार प्रपंच पुढे करण्याचे काम बँकेने केले आहे.इंदापूर तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा बँक हि एक अविभाज्य घटक बनलेली आहे, असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही नुतन चेअरमन देवराज जाधव व व्हा.चेअरमन सत्यशील पाटील यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी बँकेचे संचालक रामकृष्ण मोरे,विलासराव माने,अशोक शिंदे, संदीप गुळवे, ॲड.विकास देवकर, दादाराम होळ, आदिकुमार गांधी, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, उज्वला गायकवाड, अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक, ॲड.विजय पांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एस.तावरे उपस्थित होते.