शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
देश सेवेचं स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्य दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्कराने सोल्जर जनरल ड्युटीसाठी (Indian Army Women Military Police Recruitment) भरती प्रक्रिया सुरु केली असून, या भरतीमुळे भारतीय मुलींचं लष्करात काम करण्याच स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे.
जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरती (Women Military Police) पुणे, अंबाला, लखनौ, जबलपूर, बेळगाव आणि शिलांग येथे ही भरती होणार आहे. भारतीय लष्कराने ठरवून दिलेल्या योग्यता पूर्ण करणाऱ्या मुलींना 20 जुलै 2021 या कालावधीपर्यंत https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
लष्कर भरतीसाठी लागणारी पात्रता
जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दहावीमध्ये 45 % टक्के गुण असणे आवश्यक असून, वयोमर्यादा साडे सतरा ते 21 वय असणारे उमेदवार या प्रक्रियेसाटी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर उंची मर्यादा कमीत कमी 152 सेमी असणे बंधनकारक आहे.
लष्कर भरतीची निवड प्रक्रिया
जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरतीच्या उमेदवारांची निवड फिटनेस टेस्ट (PFT) आणि कॉमन एन्ट्रंस एक्झामच्या (CEE) माध्यमातून केली जाणार आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने सोल्जर जनरल ड्युटीसाठीचा कालावधी 20 जुलै 2021 असल्यामुळे लवकरात लवकर इच्छित मुलींनी वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.