बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या खासदार व संसदरत्न सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकारी व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सुळे यांच्या विकासकामांचा आढावा घेऊन बारामतीकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही सुळे यांना शुभेच्छा दिल्या.
दूध संघाच्या संचालक वैशाली साळुंके यांनी सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त खास केक तयार करून आणला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, नगरपालिका गटनेते सचिन सातव, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडियाचे सरचिटणीस प्रदिप जगदाळे, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे, बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे,बारामती तालुका विद्यार्थी अध्यक्ष तुषार कोकरे, तालुका लिगल सेलचे अध्यक्ष रविंद्र माने,
तालुका युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा आरती शेंडगे, बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण, मार्केट कमिट चे अनिल खलाटे, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ, बाळासाहेब आगवणे, संगिता पाटोळे, सुवर्णा तावरे, दिपाली पवार, पै. सुधाकर माने, रणजित धुमाळ, शब्बीर शेख, पैगंबर शेख, वैभव पवार, सौरभ राऊत, सूर्यकांत पिसाळ आदींसह बारामती तालुक्यातील व शहरातील आजी-माजी पदाधिकारी व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.