संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार – बोरखेडी हद्दीत काल रात्री टाकरखेड गावातील विश्वगंगा नदीच्या पात्रात पोलिसांनी वाळूच्या चोरट्या वाहतूकीवर छापा टाकला. यामध्ये २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
बुलढाणा जिल्ह्यात वाळूची वाहतूक अथवा बेकायदा उपसा यावर कठोर प्रतिबंध घालण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत ज्ञानेश्वर देविदास सुरळकर (वय 26 वर्ष, रा. टाकरखेड, ता. मोताळा जि. बुलढाणा), व संदीप दिनकर पडोळकर (वय २५ वर्ष, रा. टाकरखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा) या दोघांवर कारवाई करण्यात आली. टाकरखेड गावातील विश्वगंगा नदीच्या पात्रात पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत दीड ब्रास रेती व तीन ट्रॅक्टर, ट्रॉलीसह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व वरील दोघांना बोरखेडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, हवालदार श्रीकृष्ण चांदुरकर, पोलिस शिपाई गजानन गोरले, विजय सोनोने, सतिश गुंजकर यांच्या पथकाने केली.