पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने 2 वर्ष ते 17 वर्षाच्या मुलापर्यंत कोरोनाला प्रतिबंधक ठरणाऱ्या कोवोव्हॅक्स या नव्या लसीच्या चाचणीस सुरुवात केली होती, मात्र त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटला हा झटका यापूर्वीच्या या लसीचे प्रौउ व्यक्तींवर झालेले परिणाम आणि चाचण्यांचा डेटा सादर न केल्याने दिला असल्याचे सांगितले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडे यासंदर्भात चाचणी साठी परवानगी मागितली होती. मात्र केंद्रीय समितीने ही परवानगी देऊ नये अशी शिफारस केली.
दरम्यान यातील त्रुटी पूर्ण करून सीरम पुन्हा ही परवानगी मागण्याची शक्यता आहे. यानंतर सीरमला पुन्हा लसीची चाचणी घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.