डॉक्टर दाम्पत्याची वानवडी येथे आत्महत्या; घरगुती वादातून वरील प्रकार
पुणे : महान्यूज लाईव्ह
आज डॉक्टर्स डे…! सगळीकडून डॉक्टरांना शुभेच्छा मिळत असताना पुण्यातील वानवडी मध्ये मात्र वेगळाच प्रकार घडला आहे.. आपापसातील गैरसमज व घरगुती वादातून डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे…!
डॉक्टर दाम्पत्याने कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी (पुणे) हद्दीतील आझादनगर परिसरात गुरुवारी (ता. १) सकाळी उघडकीस आला आहे.
निखिल शेंडकर (वय-२६) आणि त्यांच्या पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय-२६, दोघेही रा. आझाद नगर वानवडी, पुणे ) अशी आत्महत्या केलेल्या तरुण दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल व अंकिता शेंडकर हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. निखिल हा कासवती गावात प्रॅक्टिस करत होता. तर अंकिताही दवाखाना चालवत होती. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद होते. होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी निखिल आणि अंकिता यांच्यात असाच वाद झाला. निखिल हा घरी येत असताना फोनवरून त्याच्यात संभाषण झाले आणि तो घरी आल्यानंतर त्याने पाहिले, तेव्हा अंकिताने गळफास लावून आत्महत्या केली आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर निखिल यानेही नैराश्यातून गुरुवारी सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेनंतर वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र निखिल आणि अंकिता यांच्या या कृत्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.