ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
पिंपरी : बेकायदेशीरपणे कत्तलखान्यात गाई वाहतूक करणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार कलम 9, 5 (अ), 5 (ब) च्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खंडू सुभाष पाटील वय 21, इर्शाद हमिद कुरेशी, युसुफ रज्जाक कुरेशी, फारुख सत्तार कुरेशी (वय 37, सर्व रा. पिंपरी) अशी तक्रार दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक दीपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास अंधार असताना आरोपींनी एका वाहनामध्ये तीन गाईंना त्यात भरुन त्यांनी कत्तल करण्यासाठी चालवले होते.
गाई कत्तल करण्यासाठी नेणार आहे याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी वाहनावर धाड टाकली आणि कारवाई करून चौघांवर गुन्हा दाखल केला.यातील खंडू पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.