ऋतुजा थोरात: महान्यूज लाईव्ह
बाॅलावुडमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला आणि चित्रपट सृष्टीतील चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
आलियाला ऐश्वर्य डेटींग करत असल्याची चर्चा आहे. मात्र, या विषयावर आलियाशी संवाद साधताना ती म्हणाली, आमच्या विषयी या सर्व अफवा उठवल्या जात आहेत. या अफवा खोट्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातु ऐश्वर्य आणि मी फक्त केवळ चांगले जिवाभावाचे मित्र आहोत, अशी भावना तीने व्यक्त केली असून तिने असल्या अफवांवर विचार करु नका, त्यावर लक्ष देण्याची गरज नाही असे ही ती म्हणाली आहे.
ऐश्वर्य हा माझा जवळचा मित्र असुन तो अत्यंत प्रभावशाली व सर्व गुण संपन्न मुलगा आहे. माझ्या आणि ऐश्वर्यच्या डेटिंगच्या चर्चांमुळे अनेक लोकांमध्ये आमच्या नात्याबद्दल विशेष चर्चा सुरू होती मात्र, आता त्याचीही बोलती बंद झाली आहे, असं अलायाने एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे.