दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा हद्दीत चौफुला – सुपा रोडलगत असलेल्या विटभट्टीचे मालकाशी जुन्या वाद होता. मात्र मालकाचा हा वाद कामगाराच्याच जीवावर बेतला, या कामगारास दगड आणि काठीने मारहाण करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती पाटस पोलीस
चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली. अंकुश वसंत शिंदे ( वय 27, रा. देऊळगावगाडा ता.दौंड.जि.पुणे ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देऊळगावगाडा हद्दीत बुधवारी (दि.29) सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चौफुला – सुपा रोडलगत देऊळगावगाडाच्या हद्दीत सोमनाथ विक्रम शिंदे यांची विट्टभट्टी आहे. सोमनाथ शिंदे आणि अंकुश शिंदे यांचा जुना वाद होता. या वादाच्या कारणावरून सोमनाथ शिंदे यांच्या विट्टभट्टीवरील कामगार गोविंद सुकलाल (मुळ रा. नेपानागर, जि बुराणपुर मध्य प्रदेश,सध्या रा.देऊळगावगाडा ) यांस दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बेटपाटी जवळ मोकळ्या मैदानात नेवून डोक्यात, तोंडावर दगडाने आणि काठीने मारहाण केली. या मारहणीत कामगार गोविंद सुकलाल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सोमनाथ शिंदे यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने अकुंश शिंदे यांच्यावर जीव मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी अकुंश शिंदे यास ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत.