मुंबई : महान्यूज लाईव्ह
भाजपच्या पदाधिकारी शिबिरात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव मांडला होता. त्यावरून भाजपवर टीका करण्यात आली मात्र त्यानंतर पुन्हा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीवर राजकीय व चौकशा द्वारे दबाव वाढवण्यास भाजपने सुरुवात केल्याची मानले जात आहे.
ग्रह मंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीच्या फेऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संदर्भात किरीट सोमय्या आणि इतर नेते बोलत होते. मात्र अचानक भाजपने आपला मोहरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वळवला आहे. हा मोहरा वळविण्यामागे महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.
दरम्यान वसुली प्रकरणाच्या संदर्भात त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सचिन वाजेच्या पत्रात यासंदर्भात आरोप असल्याने अजित पवार यांची चौकशी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.