इंदापूर : महान्यूज लाईव्ह
रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेटच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी, वरकुटे खुर्द, पडस्थळ, इंदापूर, पिटकेश्वर, शिंदेवस्ती व काळेवस्ती (निमगाव केतकी) या भागातील 275 गरजू कुटूंबांना 2 लाख 75 हजार रूपये किंमतीच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
एस.जी.ॲनॅलिटीक्स साॅफ्टवेअर कंपनीचे प्रमुख सुशांत गुप्ता व रोटरी क्लब ऑफ बिबबेवाडीचे अध्यक्ष अंकुश पारेख यांच्या सहकार्यातून व रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेटच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी शिंदेवस्तीवरील किटवाटपासाठी सुनिल बोराटे व सुभाष बोराटे व विठ्ठलवाडी येथील किट वाटपासाठी दिलीप भोंग, सुहास बोराटे, पोपट बोराटे, दत्ता नाळे, नवनाथ डाके, माजी सरपंच सुनिल बोराटे, विकास रासकर, सुरेश भोंग, राजु भोंग आणि नितीन डाके, वरकुटे खुर्द येथील किट वाटपासाठी शशिकांत शेंडे यांनी तर पिटकेश्वर येथील किट वाटपासाठी रो. संंजय म्हस्के, रो. राजेंद्र भोंग,रो. शिवाजी शेंडे,रो. रमेश बरळ यांनी, तर पडस्थळ येथील किट वाटपासाठी रमेश जाधव व घोळवे गुरुजी यांनी तर काळेवस्ती येथील किट वाटपासाठी अमोल राऊत यांनी तर इंदापुर येथील किट वाटपासाठी मुक्ताई टेक्सटाईलचे मालक सचिन चौरे यांनी सहकार्य केले.
या सर्व दानशुरांचे रोटरी क्लब आॕफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेज यांचे वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. नुकतेच रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, निमगांव केतकी या ठिकाणी दिड लाख रुपये किंमतीचे 4 आॕक्सीजन कॉन्संट्रेटर देण्यात आले असून आगामी काळात आणखी 225 किराणा किट, 10 हजार शालेय विद्यार्थ्यांना केशर आंब्याची झाडे, 1 हजार शेतकऱ्यांना 15 हजार फळवृक्ष वाटप, 16 प्राथमिक शाळांत 40 इंची 1ली ते 10 वी च्या अभ्यासक्रमासह स्मार्ट एल ई डी 23, C P U 20, माध्यमिक शाळांमधील 5,000 मुलींना वर्षभर पुरतील इतकी सॕनिटरी नॅपकीन पॅडचे मोफत वाटप रोटरी क्लबतर्फे करण्यात येणार असल्याची ग्वाही शशिकांत शेंडे यांनी आज यावेळी दिली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेट चे अध्यक्ष तुषार शेंडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक-अध्यक्ष शशिकांत शेंडे यांनी स्वागत केले. रो.संजय म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. रोटरीचे शिवाजी शेंडे, राजेंद्र भोंग, रमेश बरळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.