जळगाव : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावातील चुलत्या पुतण्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
गावातील हिरतसिंग जगतसिंग पवार व त्यांचा १७ वर्षीय पुतण्या मृणाल इंद्रजित पवार हे दोघे गिरणा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. वरखेडे धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.