संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार पोलिसांनी केलेल्या कारवाईत पेट्रोलिंगच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी पोलिसांनी जेरबंद केली. यामध्ये पोलिसांनी दरोड्यासाठी वापरल्या जाणारे साहित्य जप्त केले.
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गीते यांच्या आदेशानुसार अंधेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला होता. यात दरोड्याचा तयारीत असणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी रोख रक्कम 5130 रूपये, एक धारदार तलवार 500 रुपये, कुलूप कटावणी,
मिरची पूड, दोरी, चाकू/सुरा, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 3 लाख 45 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत 1) जगन मेहराम जाधव (वय 55 वर्ष रा जोधनखेड ता मुक्ताईनगर), 2) लतीफ फकीरखा तडवी (वय 32 रा जोंधनखेड), 3) विशाल प्रभाकर चांडक (वय 19 वर्ष रा जोंधनखेड), 4) गोपाळ रामदास भोजने (वय 27 वर्ष रा काकोडा ता मुक्ताईनगर), 5) दगडू शाबासखा तडवी (वय 37 वर्ष, रा जोंधनखेड) यांना पोलिसांनी अटक केली.
फौजदार निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार,
श्रीकृष्ण चांदूरकर, रघु जाधव, गजानन आहेर, विजय वारुळे, गजानन गोरले, विजय सोनोने, सुभाष वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.