विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : राज्याच्या कृषी विभागाने घेतलेल्या राज्यस्तरीय रब्बी हंगाम (२०२०) पीक स्पर्धेत ज्वारी गहू हरभरा करडई या पिकांमध्ये हेक्टरी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या पीकनिहाय पहिल्या तीन शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना अनुक्रमे 50, 40 व 30 हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत . सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीतून पीकनिहाय तीन विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्याची पीक उत्पादकता वाढवण्याचे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करते. मागील वर्षीचा हा निकाल असून यामध्ये पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटनिहाय शेतकऱ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
सन २०२० च्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, जवस, तीळ व करडई या सहा पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली होती, मात्र जवस व तीळ या दोन पिकासाठी स्पर्धक कमी आल्याने स्पर्धा झाली नाही. ज्वारी, गहू, हरभरा व करडई या चार पिकांसाठी ६ हजार ५३ शेतकरी सहभागी झाले होते.
ज्वारी : सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री.साहेबराव मन्याबा चिकणे, (सोनगांव, ता.जावली, जि.सातारा, हेक्टरी १०१ क्विंटल); द्वितीय क्रमांक : सोमनाथ बाबुराव मुंडेकर, मु. पो.आरसोली, ता.भुम, जि.उस्मानाबाद ( हेक्टरी ९४.३० क्विंटल)
तृतीय क्रमांक : श्री.नितीन बाजीराव वरखडे, मु.पो.वरखडवाडी, ता.वाई, जि.सातारा ( हेक्टरी ९० क्विंटल)
ज्वारी आदिवासी गट
प्रथम क्रमांक : आटया देवजी पाडवी, पो.खेडले, ता.तळोदा, जि.नंदुरबार ( हेक्टरी ५१.५० क्विंटल) द्वितीय क्रमांक : नोवा आटया पाडवी, मु.पो.नर्मदानगर, ता.तळोदा, जि.नंदुरबार (हेक्टरी ४३ क्विंटल), तृतीय क्रमांक : बापू नागो पवार, मु.पो.कळंबू, ता.शहादा, जि.नंदुरबार (हेक्टरी ३६.४० क्विंटल)
गहू सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री.सुहास वसंतराव बर्वे, मु.पो.डुबेरे, ता.सिन्नर, जि.नाशिक, (हेक्टरी ९०.७१ क्विंटल), द्वितीय क्रमांक : आप्पासाहेब नामदेव आरोटे, मु.पो.महाजनपूर, ता.सिन्नर, जि.नाशिक (हेक्टरी ९० क्विंटल), तृतीय क्रमांक : श्री. शिवाजी बाजीराव सोमवंशी, मु.पो.सुंदरपूर, ता.निफाड, जि.नाशिक ( हेक्टरी ८२.९८ क्विंटल)
गहू आदिवासी गट
प्रथम क्रमांक : श्री. विठ्ठल भिवा आवारी, मु.पो.साकुर, ता.ईगतपुरी, जि. नाशिक ( हेक्टरी ६०.१० क्विंटल), द्वितीय क्रमांक : श्री. सुधाकर बापूराव कुंभेरे, मु.पो.लोणसावळी, ता.वर्धा, जि वर्धा. (हेक्टरी ५४ क्विंटल), तृतीय क्रमांक : श्री. महेंद्र दौलत नैताम, मु.पो. खैरगाव दे., ता. पांढरकवडा, जि.यवतमाळ ( हेक्टरी ५३.६८ क्विंटल)
हरभरा सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री. वसंत पांडुरंग कचरे, मु.पो. काटेवाडी, ता. खटाव, जि.सातारा (हेक्टरी ६३.१० क्विंटल) द्वितीय क्रमांक : श्री.सुरेश देवबा चेके, मु.पो. पिंपरी, ता.वर्धा, जि.वर्धा (हेक्टरी ५५ क्विंटल) तृतीय क्रमांक : श्रीमती सुमन शिवाजी जगताप, मु.पो.सुरवड, ता.इंदापूर, जि.पुणे (हेक्टरी ५४.३२ क्विंटल)
आदिवासी गट प्रथम क्रमांक : श्री. हिराचंद मोतीराम गावीत, मु.पो.धनेर दि.,ता.कळवण, जि.नाशिक (हेक्टरी ४८.३० क्विंटल), द्वितीय क्रमांक : श्री. कैलास राजाराम पवार मु.पो.ईनशी, ता.कळवण, जि.नाशिक (हेक्टरी ४२.२६ क्विंटल), तृतीय क्रमांक : श्री. देवराव कोन्दुजी शेडमाके, मु.पो.डोंगरगांव मक्ता, ता.गोडपिंपरी, जि.चंद्रपूर (हेक्टरी ४१.३१ क्विंटल)
करडई : सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री. राजेश हनमंतराव हाळदे, मु.पो.आतूर, ता.देगलूर, जि.नांदेड (हेक्टरी ३४.७२ क्विंटल), द्वितीय क्रमांक : श्री. निल नामदेव चिमनपाडे, मु.पो. कुडली, ता.देगलूर, जि.नांदेड ( हेक्टरी २७.७९ क्विंटल), तृतीय क्रमांक : श्री. प्रतापरेडडी देवन्ना चिंतलवार, मु.पो.आलूर, ता.देगलूर, जि.नांदेड ( हेक्टरी २३.५६ क्विंटल)