बारामती : महान्यूज लाईव्ह
पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. त्यातच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी ला अनपेक्षितरीत्या पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. मात्र आता राष्ट्रवादीचे बळ पुन्हा एकदा झाले वाढणार आहे. राष्ट्रवादीसाठी हीच गुड न्यूज आहे
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदार संघातील शेकापचे आमदार शामसुंदर शिंदे त्यांच्या घरी चहापान केले. या चहापानानंतर शिंदे यांनी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
विशेष म्हणजे शिंदे यांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्या सारखे अत्यंत वेगाने काम करणारे नेते आहेत. माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी सारखा दुसरा पर्याय दिसत नाही असे सांगत श्यामसुंदर शिंदे यांनी आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार असल्याचं दिसून येत आहे.