दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : नवीन परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये,यासाठी रोटरी क्लब लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करीत आहे.ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण,पाठाचे नियोजन, मूल्यमापन, सरल व शासनाला आवश्यक अहवाल उपलब्ध होतील असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी केले.
वाई रोटरी क्लबच्या वतीने येथील मुरलीधर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील शिक्षकांना टेक्नोसॅव्ही टीचर्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. उपाध्यक्ष दीपक बागडे, राजेंद्र धुमाळ, प्रशांत पोळ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी हेरकळ म्हणाल्या, गुणवत्तापूर्ण साक्षरता या विषयावर रोटरी क्लबचा कटाक्ष आहे. सिस्टिममुळे विद्यार्थी स्मार्ट टीव्हीला टॅब्लेट जोडून ट्युशनसारखा स्वतः अभ्यास करू शकतील. शिक्षक प्रशिक्षणात ८५ हजार शिक्षकांनी प्रशिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल माने, सारिका मोरे, किरण पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
नामदेव पोटकुले, राजेंद्र जाधव, किरण पवार, सुनीता वैराट, संजय वाघमारे, प्रमिला राठोड, संतोष भोसले, स्मिता गोरे, प्रकाश रासकर, पल्लवी भोसले, महेश सपकाळ, विनोद सुतार, रमेश डोईफोडे, गजानन खंदारे, राहुल क्षीरसागर, रमेश जाधव, मनीषा नवले, जयंत धायगुडे, सविता सुतार, महादेव क्षीरसागर, रूपाली पिसाळ, रामदास जाधव, सारिका मोरे, राजेंद्र क्षीरसागर, गणेश शेलार यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले नीला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांनी आभार मानले.