महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दिल्ली जिंकल्यानंतर ‘आप’ने आता गुजरातवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. आज आम आदमी पार्टीमध्ये गुजरातमधील तगड्या व देशात हिरो झालेल्या हिरे कंपनी उद्योजकास प्रवेश देण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्या दृष्टीने आम आदमी पार्टीच्या वतीने गुजरातमध्ये हालचाली सरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महेश सवानी यांना आप मध्ये प्रवेश देण्यात आला. सूरत मधील हिरे व्यापारी म्हणून महेश सवानी हे प्रसिध्द आहेत. या प्रवेशानंतर गुजरातमधील राजकारण एका नव्या वळणावर असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी व्यक्त केली.
सवानी यांनी मध्यंतरी दिवाळीच्या बोनसमध्ये कामगारांना फ्लॅट, कार भेट दिल्या होत्या. त्यांच्या या अनोख्या बोनस पध्दतीमुळे ते देशभर चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांनी ५०० मुलींचीही लग्ने लावून दिली, त्यामुळेही ते सामाजिक क्षेत्रात सुपरिचित झाले आहेत.