संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार येथे आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त “सामाजिक न्याय दिनाचे” औचित्य साधून, ओ.बी.सी. समाजाचे रद्द झालेले आरक्षण हे मोदी सरकारची ओ.बी.सी. समाजाप्रती असलेली उदासीन कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने केला.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार लोणार शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील तहसिल कार्यालयात तहसीलदारांकडे निवेदन देऊन मोदी सरकार विरोधात निदर्शने, प्रचंड घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी लोणारचे काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश मापारी, लोणार नगरपरिषदचे गटनेते भूषण मापारी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, साहेबराव पाटोळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित विभागाचे संघटक सतीश राठोड, नगरपरिषद लोणार माजी उपाध्यक्ष शेख समद, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे शेख तौफिक कुरेशी, युवक काँग्रेसचे अकिल कुरेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.