महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मागील तीन महिन्याच्या तुलनेत तब्बल अडीच हजारांनी सोन्याचे दर उतरले, तर मागील सहा महिन्याच्या तुलनेत तब्बल ४ हजार रुपयांनी तोळ्यामागे सोन्याचे दर उतरलेले आज पाहायला मिळाले.
डॉलरचा भाव वधारल्याने सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला असून दुसरीकडे कोरोनाचा रुग्णसंख्येचा दर कमी येताच सोन्याचे दरही घसरलेले दिसत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढली की, सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ होत असल्याचे गेल्या वर्षीपासून निरीक्षणात आले आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी २२ कॅरेट सोन्याचा दर ४५ हजार ५५० रुपये होता. तर तो आज २२ कॅरेटसाठी प्रतिदहा ग्रॅम ४५२२० रुपये होता. २४ कॅरेट ४८ हजार ४०० रुपये दर होता, तर मागील महिन्यात २४ कॅरेटचा ४९ हजार ६०० रुपये होता. तर सहा महिन्यांपूर्वी ५२ हजारांवर होता.
बारामतीतील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सकडूुन मिळालेल्या माहितीनुसार आज १८ कॅरेटचा प्रतितोळा दर ३७ हजार ३५० रुपये, २२ कॅरेटचा दर ४५ हजार ५२० रुपये, २३ कॅरेटचा दर प्रतितोळा ४६ हजार ६९० रुपये, २३.५ कॅरेटचा दर ४६ हजार ९४० रुपये तर ९९.५ कॅरेट म्हणजे २४ कॅरेटचा दर हा ४७ हजार ९२० रुपयांपर्यंत होता. चांदी प्रतिकिलो ६९ हजार ४०० व बार मध्ये ६९ हजार ७०० रुपये प्रतिकिलो असा दर आज नोंदवला गेला.