दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – वाठार रस्त्यावरुन जोशीविहीर बाजूकडुन
भरधाव वेगात येणारी बुलेट ही ओझर्डे गावानजिक रात्री ११. ३० वाजण्याच्या सुमारास येताच बुलेटचा पाठीमागचा टायर फुटल्याने चालकाचा बुलेटवरील ताबा सुटला आणि ओझर्डे गावातील रस्त्याकडेच्या घरासमोरील सागवानाच्या झाडावर जाऊन आदळली. यात चालक लक्ष्मण बाळु एरंडे (रा.मालदेववाडी ता.वाई ) हे गंभीर जखमी झाले व अंगणात खाली कोसळले
आपल्या दाराशेजारील चौकटी जवळ काही
तरी आदळल्याचा आवाज या झोपी गेलेल्या गावातील तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष
कदम यांना आल्यामुळे त्यांचे कुटुंब दार उघडून बाहेर आले असता रक्ताच्या थारोळ्यात
एक तरुण बुलेट मध्ये अडकलेल्या अवस्थेत
पडल्याचे पाहीले.
त्यांनी तात्काळ रुग्ण वाहिकेला कॉल केला परंतु रुग्णवाहिका वेळेत आली नसल्याने भाऊसाहेब
कदम यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या पोलिस मित्र संघटनेत असलेल्या मंदार, मिलिंद व मनोज या तीनही मुलांना झोपेतून ऊठवून आणले आणि मदतीला निलेश गवते यांना घेऊन गंभीर जखमी अवस्थेत लक्ष्मण एरंडे यास स्वमालकीच्या वाहनाने वाई येथील ग्रामीण रुग्णालयासह इतरही दवाखान्यात नेले.
मात्र प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांनी ऊपचार करण्यास नकार दिल्याने ही चारही मुले हतबल
झाली. वाईतील डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जखमी लक्ष्मण हा तरुण बेशुद्ध पडला. पुढे या चारही तरुणांनी प्रयत्नांची हार न मानता तब्बल १० कि.मी.अंतरावर असणाऱ्या भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून तेथील उपस्थित डॉक्टरांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात त्यास उपचारासाठी पाठवले.
मात्र दुर्दैवाने जखमी लक्ष्मण हा सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता असे तेथील डॉक्टरांनी घोषित
केले. त्याला वेळेत ऊपचार वाईतील डॉक्टरांनी
केले असते, तर जखमी लक्ष्मण एरंडे हा तरुणावर किमान व्यवस्थित उपचार झाले असते असे मत
भाऊसाहेब कदम तसेच मंदार, मिलिंद व मनोज या त्यांच्या मुलांनी व्यक्त केले. दरम्यान वाईतील डॉक्टरांच्या अशा वागण्याने ओझर्डे गावासह शहरातही संताप व्यक्त केला जात आहे.