बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतील तांदुळवाडी येथे होणाऱ्या प्रस्तावित उद्यानामध्ये क्लायबिंग वाॅल सुरू करण्याची मागणी बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष अॅड सचिन वाघ यांनी केली.
यावेळी अँड वाघ यांनी बारामती ट्रेकर्स क्लबच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना किल्ले सफर घडवून आणली असून, ट्रेकिंग, क्लायबिंगची सफर घडवण्यासाठी व किल्ले संवर्धनासाठी इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी ट्रेकर्स क्लब सदैव प्रयत्नशील असतो अशी माहिती अजितदादांना दिली.
क्लायबिंग हा साहसी, धाडसी प्रकार करताना युवक-युवतींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो व अनेक युवक केवळ सुविधा नसल्या कारणामुळे या साहसी प्रकारापासून दूर राहत आहेत अशी खंत देखील अँड वाघ यांनी पवार यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली.
बारामती सारख्या प्रगत भागामध्ये क्लायबिंग वॉल तयार केल्यास आपल्या भागातील अनेक मुले मुली ऑलम्पिंक सारखे स्पर्धेत क्लायबिंग या खेळामध्ये चमकू शकतात. क्लायबिंग वॉलच्या माध्यमातून बारामतीच्या वैभवामध्ये भर पडेल, सोबतच मुला-मुलींमध्ये इतिहास गड किल्ले संवर्धन याची आवड निर्माण होईल.
त्याचबरोबर रॉक क्लायबिंग असा खेळ प्रकार आहे, ज्यामुळे शारीरिक-मानसिक नियंत्रणासह गिर्यारोहणाची शक्ती, सहनशक्ती,चपळता आणि संतुलन याचा समतोल साधून माणूस परिपक्व बनतो. त्यामुळे क्लायबिंग वाल बनवल्यास एक आदर्शवत कार्य आपल्या हातून घडेल व बारामती सारख्या शहरांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून अनेक विद्यार्थी युवक-युवती ट्रेनिंग घेऊन ऑलम्पिक मध्ये सहभागी होऊ शकतात असे ही ट्रेकर्स क्लबच्या अँड वाघ यांनी नमूद केले.
यावर अजितदादांनी लवकरात लवकर प्रस्तावित उद्यानामध्ये क्लायबिंग वॉल तयार करू असे आश्वासित केले. यामुळे भावी पिढीला ट्रेकिंगचे ट्रेंनिग मिळणं सोपे जाईल. ही बाब गड-किल्ले प्रेमीं मध्ये उत्साह वाढवणारी आहे. यावेळी बारामती नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बारामती ट्रेकर्स क्लबचे प्रशांत राजपुरे, ऋतुराज काळकुटे, राहुल झाडे उपस्थित होते.











