विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे, सातारा जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडे असे अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवलेला इंदापूर तालुक्यातील चिखली येथील 10 गंभीर गुन्हे असलेला प्रवीण प्रल्हाद राऊत (वय 29 वर्षे) याला काल मुंबईतील गोरेगाव येथे मुंबई व पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पकडले.
भोर येथील लॉकअप तोडून राऊत फरार झाला होता. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेली होती. या गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की वरील आरोपी नामे प्रवीण प्रल्हाद राऊत (वय 29 रा.चिखली ता.इंदापूर जि. पुणे) हा चिखली येथे या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो स्टे चे पथकांना मिळाली होती .त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले होते. त्यावेळी सदर टोळीतील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3(1)(¡¡) 3(4) प्रमाणे कारवाई करण्यात आली होती.
17 फेब्रुवारी 2021 रोजी भोरच्या पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे लॉकप मधून पळून गेले होते.
सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
मात्र 15 एप्रिल 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रकांत लोखंडे याला मोठ्या शिताफीने खेड शिवापूर येथे पकडले. मात्र प्रविण प्रल्हाद राऊत हा फरार होता .
अखेर 15 जून 2021रोजी बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, प्रवीण प्रल्हाद राऊत (वय 29) हा हॉटेल अरमा टाऊन हाऊस गोरेगाव वेस्ट, मुंबई येथे असल्याची गोपनीय बतमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले असून त्याची वैदकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राऊत याच्यावर फलटण शहर बारामती तालुका वालचंद नगर पोलीस ठाणे जेजुरी पोलीस ठाणे भिगवन पोलीस ठाणे रायगड पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीतील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
ही ती कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, फौजदार अमोल गोरे, हवालदार ज्ञानेश्वर शिरसागर, राजू मोमिन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, महिला पोलिस कर्मचारी पुनम गुंड, सुजाता कदम, हवालदार मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.











