दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखणीक हे गेली ४० ते ५० वर्षांपासून वाई तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या जागेत नागरिकांना लागणारे मुद्रांक पेपर आणि विविध प्रकारचे खरेदी विक्री करण्यासाठी असणारे लेखणीक असे सर्वजण तहसील कार्यालयाच्या
आवारातील जागेत बसत आहेत. सध्या तेथील इमारत पाडल्याने मुद्रांक विक्रेते व लेखनिक यांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नविन इमारतीत बैठक व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षापासून परवानाधारक असलेले मंगेश बाचल, रघुनाथ मालुसरे, जगन्नाथ जगताप, विद्याधर जगताप, विनोद सकुंडे, संदीप माने, संतोष शिंदे, प्रकाश बाबर, विलास जोशी, शिवाजी वाडकर आदी वाई शहरातील तहसील कार्यालय आवारातील जागेत मुद्रांक विक्री करतात.
काही महिन्यांपूर्वी वाई महसूल कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत नव्याने बांधल्याने त्या इमारतीच्या चौफेर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे मुद्रांक विक्रेते आणि जमीन खरेदी विक्री दस्त लिहिणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. यापूर्वीची बैठक व्यवस्थेची इमारत सध्या पाडण्यात आल्यामुळे या लोकांची बसण्यासाठीची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
ही गैरसोय दूर करणेकरीता येथील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखणिक यांनी एकञित येऊन तहसील कार्यालयाची झालेल्या नवीन इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा ऊपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्याकडे केली आहे.











