जळगाव : महान्यूज लाईव्ह
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आम्ही सत्य तर होतो पाच वर्ष शिवसेना सतत होती मात्र सत्तेत असूनही गुलामास सारखीच वागणूक मिळाली असा गौप्यस्फोट आणि गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज जळगाव मध्ये केला.
संजय राऊत यांच्या या आरोपामुळे आता नव्याने महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजपमधील राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप पुन्हा पेटणार आहे. तिकडे दिल्लीमध्ये नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली होती. ही बंद दाराआड झालेली चर्चा म्हणजे शिवसेना आणि भाजपचे संबंध सुधारण्याची वाटचाल मानली जात होती. मात्र राऊत यांच्या विधानाने त्यामध्ये आता खोडा पडला आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात बोलताना प्रशांत किशोर हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत, आम्ही देखील त्यांना पूर्वी भेटलेलो आहे. ते एक व्यवसायिक राजकीय रणनितीकार आहेत. ते कोणालाही भेटू शकतात, असं सांगतानाच शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील भेट म्हणजे राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.











