शिरूर : महान्यूज लाइव्ह
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती प्रकाश पवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, संचालक आबाराजे मांढरे, सुदीप गुंदेचा, सतीश कोळपे, बंडू जाधव, प्रवीण चोरडिया आदी यावेळी उपस्थित होते.
शंकर जांभळकर हे गेल्या वर्षभरापासून बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात बाजारसमितीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. यामध्ये प्रामुख्याने पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न केले. अँड्रॉइड ॲप द्वारे कामकाजात सुसूत्रता आणली.लिलाव पारदर्शक केले.
ई नाम व्यापार प्रक्रिया राबवत शेतक-यांना अधिक फायदा मिळवून दिला. सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले. तेलबिया व्यापार वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. शंकर जांभळकर यांनी कालावधी पूर्ण झाल्याचे सांगत विहित वेळेत राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.











