इंदापूर नगरपरिषद,उपजिल्हा रुग्णालय व इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त उपक्रम
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने इंदापूर नगरपरिषद,उपजिल्हा रुग्णालय व इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सुपर स्प्रेडर असणारे भाजीविक्रेते व नागरिक यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा प्रारंभ झाला. यामध्ये शंभर नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या.
इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ही चाचणी चालू असताना शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देवून नागरिकांशी व भाजीविक्रेते यांच्याशी संवाद साधला. ही टेस्ट व लसीकरण करून घेणे कसे आवश्यक आहे आणि कोरोना आजारापासून आपला कसा बचाव करता येईल याबाबत अंकिता शहा यांनी मार्गदर्शन केले.
येथून पुढे इंदापूर शहरात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर टेस्टिंग केले जाणार आहे. त्यास नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकरी रामराजे कापरे यांनी केले.