पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे शहरात आजपासून अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बंदी नाही. पीएमपीएल बससेवा 50% क्षमतेने सुरू होणार आहे. बँका आणि इतर प्रकारच्या वित्तीय संस्थांचे कामकाज देखील आठवडा भर सुरू राहणार आहे. शहरातील सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. पाच वाजल्यानंतर मात्र जमाबंदी आणि संचारबंदी लागू असेल.
पुण्यामध्ये कोरोना चे प्रमाण तुलनेने कमी झाल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट दुपारी चार वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. शनिवारी आणि रविवारी हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा ही सुरू राहील. मैदाने सकाळी पाच ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ परवानगी असेल . सार्वजनिक ठिकाणी पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत परवानगी राहील. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम 50 जणांच्या उपस्थितीत करता येईल.
अंत्यविधीसाठी वीस जणांची उपस्थिती बांधकाम करता दुपारी चार वाजेपर्यंत मुभा शेतीविषयक कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत करता येईल मालवाहतूक नियमित वेळेत करता येईल मात्र मॉल सिनेमा गुरु मात्र बंद आहेत जिम सलुन ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने व पूर्वनियोजित वेळ घेऊन करता येईल. शहरातील दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना आता मुभा मिळणार आहे.











