• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोणीकाळभोर मध्ये शोधलं जातेय स्मशानातील सोनं! अंत्यसंस्कारानंतर सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी पळवल्या जात आहेत!

Maha News Live by Maha News Live
June 4, 2021
in महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह

पुणे : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवा़डी, उरुळी कांचनसह परिसरातील गावांच्या स्मशानभुमितुन, अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेतुन सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवुन नेण्याच्या घटना घडु लागल्या आहेत. यामुळे पुर्व हवेलीमधील नागरीकांना आपल्या आप्तईष्ठांच्या अस्थीविसर्जन या विधीला मुकावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

पुरुष असो वा स्त्री, हिंदु धर्मात अंत्यसंस्करानंतर अस्थी विसर्जन हा विधी फार महत्वाचा व धार्मिक मानला जातो. परंतु, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या लोणी कॉर्नर येथील सामाईक स्मशानभूमीतुन अंत्यसंस्कार झाल्यानंतर राखेतील सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवुन नेण्याच्या घटना मागील काही महिणन्यांपासून वारंवार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

अस्थीविसर्जन हा विधी सर्वच नागरीकांच्या दृष्ट्रीने धार्मिक बाब असल्याने, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी मृतदेहाची राख व अस्थी पळवापळवी होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी करावी वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांनी केली आहे.

पुर्व हवेलीत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन अशी आर्थिकदृष्ट्या सधन गावे आहेत. दोन्ही ग्रामपंचायती पुणे शहराच्या शेजारी असल्याने परिसरात नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. परिणामी येथे मृत्यू पावणा-या नागरिकांची संख्याही मोठी असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात परिसरातील बरेच नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातील काही नागरिक करोनामुळे मृत्यू पावले आहेत. तर काही नागरिक वृदधापकाळाने किंवा इतर आजाराने मरण पावले आहेत. 

याबाबत अधिक माहिती देतांना कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल वेदपाठक म्हणाले, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ग्रामपंचायतींसाठी पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी कॉर्नरला असलेल्या स्मशानभूमीतून मागील काही महिन्यांपासूनपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

मृतदेह जर महिलेचा असेल तर स्मशानभूमीतील राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरीकांना सुरवातीला वरील प्रकार चुकून झाला असेल असे वाटत होते, म्हणून नागरिकांनी या घटनेकडे दूर्लक्ष केले. परंतू आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल, तर हा प्रकार सहसा होत नाही. परंतू जर बाहेरगावाहून येऊन येथे रहाणा-या कुटुंबातील महिला असेल तर नक्कीच मृतदेहाची राख व अस्थी चोरुन नेण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही सधन  ग्रामपंचायतींनी या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

याबाबत बोलतांना लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व उपसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या, स्मशानभूमीतून मृतदेहाची राख व अस्थी पळवापळवी बाबतच्या तक्रारी वाढलेल्या आहेत अंत्यसंस्कार झाल्यानंतर अस्थी विसर्जन हा विधी फार महत्वाचा व धार्मिक असल्याने, वरील प्रकारच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्वरीत प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येणार आहेत. या ठिकाणी उच्च क्षमतेचे  सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील.

Next Post

टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेतला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group