• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले; बारामतीच्या देवदूतांनी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे बारामतीत कौतुक..! तावरे यांच्या उपचारातील घटनेचा क्षणाक्षणाचा प्रसंग अंगावर काटा आणणारा ठरला..!!

Maha News Live by Maha News Live
June 2, 2021
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांना आज बारामतीतून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या्ंच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली असून पुण्यात काही दिवस त्यांच्यावर उपचार होतील असे सूत्रांनी सांगितले. आज दुपारी एक वाजता त्यांना पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी सात -साडेसात वाजता राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावर हल्ला झाला.. आणि त्यांना तातडीने दवाखान्यात हलवल्यानंतर अगदी क्षणाक्षणाला बारामतीतील डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता.. दाखवलेले प्रसंगावधान व प्रत्येक गोष्टीचा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय यामुळे अत्यंत क्लिष्ठ व गंभीर असलेला प्रसंग अगदी निभावून गेला. रविराज तावरे यांच्यावरील उपचारात बारामतीच्या व पुण्याच्या डॉक्टरांची अक्षरशः कसोटी लागली. या क्षणाक्षणाची माहिती आज बारामती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख निती महाडिक यांनी दिली, अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आणि बारामतीच्या डॉक्टरांमधील संवेदनशीलताही सर्वांच्या समोर आली.

आज तावरे यांना पुण्याला हलविल्यानंतर डॉ. महाडिक यांनी या सर्व प्रसंगाचा ऑंखो देखा हाल सांगितला. रविराज तावरे यांच्यावर संध्याकाळी माळेगावातील संभाजीनगर भागात गोळीबार झाला. त्यानंतर लागलीच तेथील दादा जराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तावरे यांना बारामतीत उपचारासाठी हलवले. त्यांना बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर क्षणाक्षणाला युध्दाचा प्रसंग असल्याप्रमाणे तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी हालचाली केल्या. बारामती हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाच्या संचालकांच्या मदतीने डॉ. भास्कर जेधे, डॉ. अमर पवार व त्या्ंच्या सहकाऱ्यांनी वेगवान हालचाली केल्या आणि अतिदक्षता तज्ञ डॉ. निती महाडिक यांनी तातडीने उपचारास सुरवात केली. अतिदक्षता विभागात घेतल्यानंतर रविराज तावरे हे बेशुध्द झाले. अति रक्तस्त्राव झाला, रक्ताच्या आठ ते दहा बाटल्या भरून रुग्णाचे ह़दयाचे ठोके नियमित केले. रक्तदाब नियमित केला. फुफ्फुस कार्यरत करून व्हेंटीलेटरवर रुग्णाची व्यवस्था केली. गोळी शरीरातच होती. त्या परिस्थितीत सिटी स्कॅन झाल्यानंतर गोळी फुफ्फुसाच्या बाहेरील बाजूला अडकल्याचे दिसून आले. ती गोळी काढण्यासाठी हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ व त्यातही फुफ्फुसाशी संबंधित शल्यचिकित्सकही गरजेचे होते. शिवाय अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुसज्ज व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर गिरीराज हॉस्पिटलमध्ये असल्याने रविराज तावरे यांना तेथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरीराज हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील सर्व व्यवस्था तत्परतेने तयार झाली.

इकडे डॉ. भास्कर जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील शल्यचिकित्सक डॉ. सूरज चव्हाण यांना तातडीने संपर्क साधून त्यांना लागलीच पुण्याहून बोलावण्यात आले. डॉ. रमेश भोईटे यांच्याशीही संपर्क साधून त्यांना पुढील कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यानंतर पुण्यातून निघालेले तज्ज्ञांचे पथक बारामतीत पोचण्याची खात्री मिळाल्यानंतर बारामती हॉस्पिटलमधून रात्री उशीरा रविराज तावरे यांना गिरीराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथून डॉ. निती महाडिक यांच्यासह तेथील आरोग्य पथक रुग्णवाहिकेतून गिरीराज हॉस्पिटलमध्ये आले. डॉ. सूरज चव्हाण, डॉ. निती महाडिक, गिरीराज हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी वर्ग, डॉ. अमर पवार, डॉ. संजय पुरंदरे, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष घालमे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर गिरीराज हॉस्पिटलमध्ये रिकव्हरी रुममध्ये पुढील विश्रांतीसाठी ठेवण्यात आले. तेथेच तेथे देखरेख करण्यात आली. मात्र पुढील उपचारात रुग्णास कोणताही अतिरिक्त संसर्ग होऊ नये, फुफ्फुस तज्ज्ञांची देखरेख राहावी यासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही झाली स्टोरी..! खरंतर बारामतीला अशा गोष्टी नवीन नाहीत, यापूर्वीही मानेवर तीक्ष्ण वार झालेल्या रुग्णास याच बारामतीत वाचविण्यात आले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांतून येथे रुग्ण येतात. अवघडातील अवघड शस्त्रक्रिया पार पडते. मात्र काही गोष्टी हातात नसतानाही जेव्हा डॉक्टर आपल्या हातात काही धागेदोरे घेऊन, जबाबदारी घेऊन काम करतात, तेव्हा असलेली आपुलकी ही बारामतीकरांसाठी असते. अनेकदा दवाखाने लुबाडतात, अधिकचे पैसे घेतात अशी ओरड असते.. ती ओरड शांतपणे ऐकून घेत त्याला काहीही प्रत्युत्तर न देणारी ही मंडळी बारामतीचाच भाग आहेत. फक्त ती एखाद्या तावरे, निंबाळकर, काळेंसाठी एकवटलेली नसतात.. ती एऱवीही तेवढीच तत्परता व प्रसंगावधान दाखवतात.. कारण बारामतीचे नाव खराब होऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते… पवार कुटुंबियांनी प्रचंड विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, रुग्ण वाचला पाहिजे अशी भावना व्यक्त केलेली आहे, अशावेळी आपले सर्व वैद्यकीय ज्ञान पणाला लावून बारामतीत परवा डॉक्टरांनी जी तत्परता व संवेदनशीलता दाखवली, ती अतुलनीय होती.. तशीच तत्परता येथील डॉक्टर गर्भवती महिलांसाठी, अपघातात अगदी जिवावर बेतण्याइतपत परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठीही दाखवतात.. अशावेळी त्यांच्याही कौतुकाचे दोन शब्द असायला हवेतच की…!!

Next Post

माता न तू वैरीणी ! सहा महिन्याच्या चिमुकल्याला रागातून अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेची पोलिसांकडून चौकशी; नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी पोलिसांनी केली चौकशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group