• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ऑनलाईन चॅटिंग’वरून मुली व महिलांची फसवणूक झाली, पण तिथे खमक्या पोलीस अधिकारी होता म्हणून….! कर्जत तालुक्यात 2 दिवसांत 3 मुली वाचल्या!

Maha News Live by Maha News Live
May 25, 2021
in यशोगाथा, महिला विश्व, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, Featured
0

ऑनलाईनच्या आभासी जगापासून दूर रहा; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन

नगर : महान्यूज लाईव्ह

2 दिवसात 3 मुलींना अशा फसवणुकीपासून कर्जत पोलिसांनी वाचविले. पालकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले, त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले.. पण गोष्ट एवढ्यात संपत नाही, सोशल मिडियाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, शेअर चॅट आदी माध्यमातून संदेश पाठवून विशेषतः मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवले जातात.. संभाषण वाढवले जाते.. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात आणि संधी साधून या मुलींना फूस लावून पळविले जाते..!

जे शहरी भागात चालले आहे, त्याचे लोण ग्रामीण भागातही येऊ लागले आहे आणि जे आभासी दिसते, त्यावर भाळुन मुलीदेखील अशा ऑनलाइन चॅटिंग च्या गुन्ह्यात अडकत आहेत आणि आपले आयुष्य पणाला लावत आहेत.. अशा मुलींना धडा शिकवणाऱ्या घटना कर्जत तालुक्यात मागील दोन दिवसात घडल्या…!

ऑनलाइन चॅटिंग मुळे प्रेमात पडून आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मुलींच्या बाबतीत तर नंतरच्या काळात अशा मुलांचे अगोदरच विवाह झालेले आहेत किंवा अशी मुले अनेक गुन्ह्यांमधील आरोपी आहेत अशा स्वरूपाची माहिती नंतर उघड होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा ऑनलाईन आणि आभासी दुनिया वरील विश्वास उघड्या डोळ्यांनी तपासा असे आवाहन कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

त्यांनी केलेल्या कामगिरीने अनेक पालकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. कारण चंद्रशेखर यादव यांनी पिंपरी चिंचवड येथील एका विवाहित इसमाने तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पुण्यात राहणारा हा इसम ज्यावर चोरी आणि इतर गुन्हे दाखल होते, त्याने कर्जत तालुक्यातील एका सधन कुटुंबातील अल्पवयीन मुलीला ऑनलाईन चॅटिंग करत आपल्या जाळ्यात अडकवले आणि संबंधित मुलीस पळवून नेण्यासाठी तो कर्जत मध्ये आला होता. मात्र रात्रगस्तीदरम्यान कर्जत पोलिसांनी संशयावरून त्याला पकडले आणि सारा प्रकार उघडकीस आला.

गेल्या पाच दिवसापूर्वी देखील गुजरात मधील एक मुलगा, जो कर्जत तालुक्यात स्वीट होम मध्ये काम करत होता, त्याने येथे नातेवाईकाकडे आलेल्या एका मुलीला गोड बोलून फूस लावली. त्याच्या खोट्या प्रेमाला भाळून ही मुलगी मुंबईकडे पोहोचली होती. मात्र कर्जत पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून तांत्रिक माहिती आणि तपासाचे कौशल्य पणाला लावत तिला मुंबईवरून परत माघारी आणले.

मागील महिन्यात देखील तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला ऑनलाइन गेम चा आधार घेत एका इसमाने पळवून नेले. परंतु तब्बल साडेसहाशे किलोमीटर अंतरावरून संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळून संबंधित मुलीला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात पोलिसांनी दिले. अशा घटना ऑनलाइन चॅटिंग मुळे घडताहेत. कोणतीही खरी माहिती व ओळख न देता पुरुषांकडून किंवा मुलांकडून मुलींची फसवणूक होत आहे. यासंदर्भात मुलींनी देखील जागरूक राहावे व पालकांनी देखील सावधानता बाळगावी असे आवाहन कर्जत पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

वेळ निघून गेल्यावर उपयोग काय?

चंद्रशेखर यादव निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे : पालकांनी आपल्या मुलांना महागडे मोबाईल देताना त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने तर होत नाही ना? याकडे सतत लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही मुलीसोबत अशी घटना घडली तर सर्व कुटुंब व्यथित होते. पण अशा घटना घडूच नयेत म्हणुन पालकांनीही मुलींना सावध करावे, त्यांचे समुपदेशन करावे. वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होत नाही. कर्जत पोलिसांची ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी कर्जत पोलीस मदत करण्यासाठी तयार आहेत.

Next Post

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडे टाकणाऱ्या टोळीला मोक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group