विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : राज्य शासनाच्या वतीने कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहोत. कोरोना रुग्णांसाठी राज्यातील धार्मिक संस्था, विविघ क्षेत्रातील उद्योजक, शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारे नागरिक हातभार लावत आहेत. ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
अष्टापुर (ता. हवेली) येथील आई. एस. आर. समृद्धी फूड्सचे (Caramella’s Cake) संचालक राजेश सुदाम कोतवाल यांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी २५००० रुपयांचा धनादेश शनिवारी (ता. १४) आमदार पवार यांच्याकडे दिला. यावेळी बोलताना पवार यांनी वरील विधान मांडले. यावेळी विजय कोतवाल, तानाजी ढोरे, बाळासाहेब कोतवाल आणि सागर हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना पवार म्हणाले, राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि महागडी औषधे खरेदी करण्यासाठी भरपूर खर्च होत आहे. यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्था विविध क्षेत्रातील उद्योजक, शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारे नागरिक यांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले अशी माहिती पवार यांनी दिली.
दरम्यान, रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी चौफुला, कोंढापुरी, शिरूर ग्रामीण रुग्णालय, सिटी बोरा कॉलेज शिरूर, न्हावरे ग्रामीण रुग्णालय, मलठण, पाबळ, कारेगाव केअर सेंटर चालवली जात आहेत. तर हवेली तालुक्यात कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, वाघोली हे कोविड सेंटर चालवली जात आहेत.











